बाळासाहेबांसारखा दिलदार विरोधक हवा. महाराष्ट्राच्या समाजमनावर जबरदस्त ठसा उमटविणाऱे कर्तृत्व श्री. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. आमचे मतभेद असले, मतभिन्नता असली तरी महाराष्ट्राचा इतिहास कधी लिहिला जाईल, तेव्हा बाळासाहेबांशिवाय तो पूर्ण होणार नाही.
कलाप्रिय बाळासाहेब
बाळासाहेब कलाप्रिय आहेत.
त्यांना संगीत,गाण्याची खूप आवड आहे.
ज्या राजकारण्यांना संगीत कळतं
अशा ज्या थोडक्या व्यक्ती आहेत,
त्यात बाळासाहेबांचा क्रमांक फार वरचा लागेल.
मराठी माणसांचे शक्तिस्थान
मला शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल नितांत आदर आहे.
शिवसेनाप्रमुख हे असे एकमेव राजकीय नेते आहेत की, जे जातीयवादापासून दूर आहेत.
सध्या राजकारण आणि जातीय समीकरणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत.
परंतु बाळासाहेब त्या दबावाखाली कधीच आले नाहीत. कार्यकर्ता, माणूस आणि गुणवत्ता यांचा विचार करूनच ते निर्णय घेतात. बाळासाहेब मराठी माणसाला मिळालेले एक शक्तीस्थान आहे आणि मराठी माणसाने त्यासाठी जगत्नियंत्याचे कायम आभार मानावयास हवेत!